महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्पॅनिश पर्यटक महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार

06:03 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिघे संशयित अटकेत : 7-8 स्थानिक तरुणांवर गुन्हा दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची, दुमका

Advertisement

झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कुरमाहाट परिसरात ही घटना घडली असून, स्पॅनिश महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. या घटनेची नोंद पोलिसात झाल्यानंतर तीन संशयितांना अटक करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अन्य संशयितांचा शोधही तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. तर पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस स्टेशन क्षेत्रातील कुरुमहाट येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर महिलेने स्वत: दुचाकीवरून जखमी अवस्थेत जवळचे आरोग्य केंद्र गाठले. सदर जोडपे दुचाकीवरून बांगलादेशातून दुमका येथे पोहोचले होते. या घटनेवेळी एक स्पॅनिश पर्यटक जोडपे तात्पुरत्या तंबूत रात्र घालवत होते. महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा पोलिसांनी शनिवारी केला. या घटनेत सात ते आठ स्थानिक तरुणांचा समावेश असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित लोकांचा शोध सुरू असल्याचे जारमुंडी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले.

झारखंडमधील हंसदिहा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. या प्रकरणात 7-8 स्थानिक लोक सामील झाल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला. तसेच झारखंडचे मंत्री बन्ना गुप्ता यांनी सरकार संबंधितांवर कारवाई करण्यास कटिबद्ध असून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article