स्पेनचा फोकिना उपांत्य फेरीत त
वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या बिगर मानांकित अॅलेजेंड्रो फोकिनाने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना पॉपीरीनचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत स्पेनच्या अल्कारेज आणि फोकिना यांच्यात गाठ पडणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फोकिनाने अॅलेक्सी पॉपीरीनचे आव्हान 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. 42 व्या मानांकित फोकिनाने 2022 साली या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या अनुभवी कार्लोस अल्कारेझने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 4-6, 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. फोकिनाने या स्पर्धेत ब्रिटनच्या जॅक ड्रेपरलाही पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.