For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनचा अल्कारेझ अंतिम फेरीत

06:41 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनचा अल्कारेझ अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / डोहा (कतार)

Advertisement

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या 2026 च्या कतार खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉपसिडेड टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने एकेरीची अंतिम फेरी गाठली.उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्कारेझने विद्यमान विजेत्या रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा पराभव केला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्कारेझने रुबलेव्हचे आव्हान 7-6 (7-3), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. 2026 च्या टेनिस हंगामामध्ये आतापर्यंत अल्कारेझने आपली विजय घोडदौड कायम राखताना 11 सामने जिंकले आहेत. तर नव्या वर्षाच्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील पहिल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. रशियाच्या रुबलेव्हने ही स्पर्धा यापूर्वीच दोनवेळा जिंकली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या सेट्समध्ये रुबलेव्हने आपली दोनवेळा सर्व्हिस गमविली. तरी पण त्याने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. अल्कारेझने टायब्रेकरमध्ये रुबलेव्हचा 7-3 असा पराभव करत पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अल्कारेझने आपल्या बेसलाईन खेळाच्या जोरावर 5-3 अशी आघाडी रुबलेव्हवर मिळविली होती. अल्कारेझने हा दुसरा सेट 6-4 असा जिंकून रुबलेव्हचे आव्हान संपुष्टात आणले. यास्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या आर्थर फिल्सने सहाव्या मानांकीत जेकुब मेन्सिकचा 6-4, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता अल्कारेझ आणि फ्रान्सचा फिल्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.