For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

स्पेनचा अल्कारेझ अंतिम फेरीत

06:26 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनचा अल्कारेझ अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, टोकियो

Advertisement

एटीपी टूवरील येथे सुरू असलेल्या जपानच्या खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या तृतिय मानांकीत कार्लोस अल्कारेझने एकेरीची अंतिम फेरी गाठताना आपल्याच देशाच्या मुनारचा पराभव केला.

उजव्या हाताच्या मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर तब्बल साडेचार महिन्यांच्या विश्रांतीनंतर अल्कारेझचे या स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्कारेझने मुनारचा 5-7, 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. या लढतीतील पहिल्या सेटमध्ये अल्कारेझने सलग 16 गुण गमविले होते. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर मुनारचे आव्हान संपुष्टात आणले. अल्कारेझचा अंतिम सामना झेकच्या जिरी लिहेकाशी होणार आहे. लिहेकाने उपांत्य फेरीच्या लढतीत व्हॅलेन्टिन व्हॅचेरॉटचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जपान टेनिस स्पर्धेत गेल्या वर्षी अल्कारेझने विजेतेपद मिळविले होते. आता तो यावेळी हे जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या मुनारने अमेरिकेच्या 12 व्या मानांकीत टेलर फ्रित्झला पराभवाचा धक्का दिला होता.

Advertisement

Advertisement

.