For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:48 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
Advertisement

 वृत्तसंस्था/ माद्रिद

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या स्पेन मास्टर्स आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभा होत आहे. या स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू यांच्या कामगिरीवर भारताचे यश अवलंबून राहिल.

गेल्या वर्षी येथे झालेल्या स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. यावेळी या स्पर्धेत सिंधूला मानांकनात दुसरे स्थान देण्यात आले आहे. पीव्ही सिंधूचा सलामीचा सामना कॅनडाच्या वेन झेंगशी होणार आहे. तर पुरूष एकेरीमध्ये भारताच्या सातव्या मानांकित किदांबी श्रीकांतला दर्जेदार कामगिरीसाठी झगडावे लागेल. गेल्या वर्षी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूला इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मॅरिस्काकडून हार पत्करावी लागली होती. तर अलिकडेच झालेल्या स्विस खुल्या सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये किदांबी श्रीकांतला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीन तैपेईच्या लिन यीकडून हार पत्करावी लागली होती. दरम्यान येत्या जुलै-ऑगस्ट कालावधित होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी श्रीकांतच्या प्रवेशाच्या आशा यापूर्वीच समाप्त झाल्या आहेत. 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील श्रीकांतची ही नववी स्पर्धा आहे. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वी म्हणजे तब्बल 16 महिन्यांच्या कालावधित श्रीकांतने शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज आणि सतिश करुना करण भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात पीव्ही सिंधू, अस्मिता चलिहाळ, मालविका बनसूर यांचा सहभाग आहे. अस्मिताचा सलामीचा सामना थायलंडच्या इन्टेनॉनशी तर मालविकाचा सामना अमेरिकेच्या वेंगशी होणार आहे. अलिकडेच झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा भारताचा लक्ष्य सेन स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार नाही. लक्ष्य सेनने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

Advertisement

महिलांच्या दुहेरीमध्ये ट्रेसा जॉली, गायत्री गोपिचंद, तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा, अश्विनी भट आणि शिखा गौतम या तीन जोड्या भारताच्या प्रतिनिधित्व करीत आहेत. पुरूष दुहेरीत कृष्णप्रसाद गर्ग व साईप्रकाश यांचा सलामीचा सामना कॅनडाच्या अॅडॅम आणि निल यांच्याशी होणार आहे. तसेच एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिला यांचा सलामीचा सामना मेक्सिकोच्या कॅस्टीलो आणि नेव्हारो यांच्याशी होईल.

Advertisement
Tags :

.