महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पेनची जॉर्जियावर 4-1 ने मात

06:23 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलोग्ने : स्पेनने सुऊवातीला गोल स्वीकारावा लागल्यानंतर जॉर्जियाचा 4-1 असा पराभव करून युरो, 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे आणि स्पर्धेतील सर्वांत लक्षवेधी अंडरडॉग्सपैकी एक असलेल्या जॉर्जियाची वाटचाल संपविली आहे. 18 व्या मिनिटाला रॉबिन ले नॉर्मंडच्या स्वयंगोलमुळे जॉर्जियाला धक्कादायक आघाडी मिळाल्यानंतर मिडफिल्डर रॉड्री आणि फॅबियन ऊईझ यांच्या गोलांनी स्पेनच्या आव्हानात बळ आणले. मुसळधार पावसाने हजेरी लावलेल्या या सामन्यात निको विल्यम्स आणि डॅनी ओल्मो यांनी उशिरा आणखी दोन गोल करून सामना जॉर्जियाच्या आवाक्याबाहेर नेला. 2022 च्या विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीतच मोरोक्कोकडून स्पेनला पराभूत व्हावे लागले होते. स्टुटगार्ट येथे शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनचा सामना यजमान जर्मनीशी होणार आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article