For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेसेक्सचा येणार आयपीओ, जगातला मोठा आयपीओ?

06:28 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेसेक्सचा येणार आयपीओ  जगातला मोठा आयपीओ
Advertisement

 7000 ते 7500 कोटी डॉलरचा असेल आयपीओ : तयारीला वेग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीचा आयपीओ लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पेसेक्सचा हा नवा आयपीओ नवा विक्रम स्थापित करू शकतो. या आयपीओचे मूल्य हे 7000 ते 7500 कोटी डॉलरचे असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

तसे झाल्यास जागतिक स्तरावरचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो असेही तज्ञांनी म्हटले आहे. यापूर्वी 2019 मध्ये सौदी अरामको यांचा आयपीओ 2900 कोटी डॉलर्सचा बाजारात लिस्ट झाला होता. स्पेसेक्स यांचा आयपीओ हा जूनमध्ये सूचीबद्ध केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्यामध्ये आयपीओशी संबंधित कागदपत्रे कंपनीकडून सादर केली जाणार असल्याचे समजते.

अधिग्रहणानंतर....

अलीकडेच कंपनीने एक्सएआयचे अधिग्रहण केले असून या अधिग्रहण करारानंतर दोन्ही कंपन्यांचे एकत्रित मूल्य 125 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. स्पेसेक्स यांचा आयपीओ सुचीबद्ध झाल्यानंतर कंपनीचे मूल्य 175 लाख कोटी रुपयांवर पोहोचू शकते, असेही म्हटले जात आहे.

लक्षात घेण्याजोगे

? सौदी अरामकोचा होता 2900 कोटी डॉलर्सचा आयपीओ

? स्पेसेक्स सुचीबद्ध झाल्यास ठरणार अव्वल

? एक्स एआयचे अलीकडेच केले अधिग्रहण

Advertisement
Tags :

.