संभळ येथील सप खासदाराची उच्च न्यायालयात धाव
एफआयआर रद्द करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे खसदार जियाउर्रहमान बर्क यांनी बुधवारी संभल हिंसा प्रकरणी स्वत:च्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी करत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत त्यांनी स्वत:विरोधात नोंद एफआयआर रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. संभल हिंसाप्रकरणी बर्क हे आरोपी असून त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
संभल हिंसेवरून 7 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. खासदार बर्क आणि आमदार इक्बाल महमूद यांचे पुत्र सोहेल इक्बाल विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांवरही संभल येथे हिंसा भडकविल्याचा आरोप आहे. हिंसेप्रकरणी आतापर्यंत 2700 जणांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णा बिश्नोई यांनी दिली आहे.
24 नोव्हेंबर रोजी संभल येथील शाही जामा मशिदीत सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पथकावर समाजकंटकांनी हल्ला केला होता. यानंतर तेथे हिंसा झाली होती. या हिंसेत 5 जणांचा मृत्यू झाला होता.