For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सप नेते आझम खान यांना जामीन

07:00 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सप नेते आझम खान यांना जामीन
Advertisement

मुलगा अब्दुल्लाच्या सुटकेची शक्मयता, मात्र आझम यांच्यापुढे अडचणी कायम

Advertisement

वृत्तसंस्था/लखनौ

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना दोन पॅनकार्ड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांची 10 वर्षांची शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर केला आहे. मात्र, दोषसिद्धीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने त्यांचे कायदेशीर आव्हान कायम आहे. या प्रकरणात अब्दुल्ला आझम यांच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखा असलेली दोन पॅनकार्डे असल्याचा आरोप करण्यात आला होता. एका पॅनकार्डवर जन्मतारीख 1 जानेवारी 1993, तर दुसऱ्यावर 30 सप्टेंबर 1990 अशी नोंद असल्याचे तपासात समोर आले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याची पात्रता मिळवण्यासाठी दुसऱ्या पॅनकार्डचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात आझम खान यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला.

Advertisement

आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा

नोव्हेंबर 2025 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने आझम खान आणि अब्दुल्ला आझम यांना या प्रकरणात सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मे 2026 मध्ये रामपूर येथील न्यायालयाने आझम खान यांची शिक्षा वाढवून 10 वर्षे केली, तर अब्दुल्ला यांची सात वर्षांची शिक्षा कायम ठेवली. आता उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे दोघांनाही या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

आझम खान यांच्या सुटकेचा मार्ग कठीण का?

जामीन मिळाल्याने तुऊंगातून तातडीने सुटका होईलच असे नाही. आझम खान यांच्याविऊद्ध अन्य प्रकरणे प्रलंबित असून, काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे दोन पॅनकार्ड प्रकरणात जामीन मिळूनही त्यांची प्रत्यक्ष सुटका इतर न्यायालयीन आदेशांवर अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे, अब्दुल्ला आझम यांची सुटकाही त्यांच्याविऊद्धच्या अन्य प्रकरणांतील स्थितीवर अवलंबून असेल. दरम्यान, शिक्षेला स्थगिती मिळणे म्हणजे दोषसिद्धी रद्द होणे नव्हे. प्रकरणातील अंतिम निकाल आणि इतर प्रलंबित खटल्यांमुळे पिता-पुत्रांच्या सुटकेबाबत पुढील न्यायालयीन घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Advertisement
Tags :

.