भारताचा विकास दर 6.4 टक्के राहण्याचा एस अँड पी ग्लोबलचा अंदाज
06:46 AM Nov 29, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
जागतिक स्तरावर कार्यरत अमेरिकेतील एस आणि पी ग्लोबल रेटिंग संस्थेने भारताच्या विकासदरात चालू आर्थिक वर्षात सुधारणा होणार असल्याचे म्हटले आहे. संस्थेने आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4 टक्के इतका राहिल असे स्पष्ट केले आहे. याआधी संस्थेने भारताचा विकास दर 6 टक्के राहणार असल्याचे म्हटले होते. देशांतर्गत आर्थिक हालचालींमध्ये झालेली वाढ तसेच महागाईत आलेली नरमाई लक्षात घेऊन एस अँड पी ग्लोबलने सुधारीत जीडीपी दराचा अंदाज मांडला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत विकासाची गती मंदावणार आहे. याला जागतिक अस्थिरतेचे कारण सांगितले जात आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 आर्थिक वर्षात 7.2 टक्के दराने विकसित झाली होती. एप्रिल ते जून तिमाहीत जीडीपी दर 7.8 टक्के इतका राहिला होता.
Advertisement
Advertisement
Next Article