सदर्न कमांडतर्फे गुरुवारी अल्ट्रा मॅरेथान स्पर्धा
कोल्हापूर :
पुण्यातील सदर्न कमांड, सेना मुख्यालयाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत आर्मी विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. विजय दिवसनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचे संयोजन 109 टी. ए. मराठा बटालियन लाईट इन्फ्रंट्रीच्या वतीने केले जात आहे. विजय दिवस कार्यक्रम संस्मरणीय व्हावा. तसेच त्यात लोकसहभागही असावा या जाणिवेपोटी 12 डिसेंबरला विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. टेंबलाई टेकडीजवळील मिल्ट्री कॅम्प येथून सकाळी 6 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.
मॅरेथॉनसाठी सदर्न कमांड, सेना मुख्यालयाने दिलेल्या सुचनांनुसार 50 किलो मीटरचे आंतर नियोजित केले आहे. मिल्ट्री कॅम्प, त्रीशक्ती पॉईंट, टेंबलाई उड्डाण पुल, आयोध्या टॉवर, ताराराणी चौक, सदर बाजार, गोल्ड जीम, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, शासकीय विश्रामगृह, लाईन बाजार, भगवा चौक, जिल्हा न्यायालय, पोलीस मुख्यालय, रमणमळा, महावीर कॉलेज, खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालय, आदित्य कॉर्नर, आरटीओ कार्यालय आणि याच मार्गावऊन परत आणि पुढील विविध मार्गावऊन पुन्हा मिल्ट्री कॅम्प असा मॅरेथॉनचा मार्ग आहे. शिवाय धावपटूंना मॅरेथॉनचा मार्ग माहिती असावा यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या धावपटूंनी पहाटे 5 वाजता मिल्ट्री कॅम्पजवळ उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
सैन्य दलातील एक्स सर्व्हिस मनांसाठी 13 रोजी आरोग्य तपासणी शिबीर व पेंशनबाबतच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा विशेष कार्यक्रमाचे आयोजित केला जात आहे. 109 टी. ए. मराठा बटालियन लाईट इन्फ्रंट्रीमध्ये हा कार्यक्रम होईल. सकाळी 9 ते दुपारी 2 अशी कार्यक्रमाची वेळ आहे. 14 डिसेंबरला मिल्ट्री कॅम्पमधील ट्रेनिंग ग्राऊंडवर 50 किलो मीटर विजय दिवस रन फ्लॅग ऑफ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुऊवात होईल, असे कमांडिंग ऑफीसर कर्नल बी. के. कल्लोली यांनी सांगितले.