For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण विभागाला 90 धावांची आघाडी

06:22 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण विभागाला 90 धावांची आघाडी
Advertisement

कर्णधार तिलक वर्माचे नाबाद शतक, श्रेयस गोपालचे अर्धशतक

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर कर्णधार तिलक वर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 9 बाद 285 धावा जमवित उत्तर विभागावर 90 धावांची आघाडी मिळविली आहे.

Advertisement

या सामन्यात उत्तर विभागाचा पहिला डाव 195 धावांत आटोपला. उत्तर विभागाच्या डावात सलामीच्या कमरान इक्बालने 1 षटकार आणि 10 चौकारांसह 76 तर दुसेजाने 5 चौकारांसह 23, कर्णधार वाधवानने 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. दक्षिण विभागातर्फे कविरप्पाने 4 तर निदेश आणि त्यागराजन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर दक्षिण विभागाने 2 बाद 40 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. तिलक वर्माच्या नाबाद शतकामुळे दक्षिण विभागाने या सामन्यात दिवसअखेर 90 धावांची आघाडी मिळविली आहे. तिलक वर्मा 225 चेंडूत 7 चौकारांसह 106 धावावर खेळत असून श्रेयस गोपालने 11 चौकारांसह 87 धावा झळकविल्या. जगदीशनने 6 चौकारांसह 36 धावा केल्या. उत्तर विभागातर्फे ब्रारने 70 धावांत 4 तर अर्शदीप सिंग आणि कंबोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: उत्तर विभाग प. डाव 195, दक्षिण विभाग प. डाव 94 षटकांत 9 बाद 285 (तिलक वर्मा खेळत आहे 106, श्रेयस गोपाल 87, जगदीशन 36, अवांतर 18, ब्रार 4-70, अर्शदीप सिंग व कंबोज प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.