ऑक्टोबर महिन्यात नैऋत्य रेल्वेची रेकॉर्ड ब्रेक कमाई
त. भा. प्रतिनिधी /बेळगाव
नैऋत्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात 5.5 दशलक्ष टन मालवाहतुकीची नोंद केली असून त्यातून तब्बल 928 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या रेकॉर्ड ब्रेक महसुलामुळे नैर्त्रुत्य रेल्वेचे कौतुक होत आहे.
या महिन्यात प्रवासी वाहतुकीतूनही चांगले उत्पन्न मिळाले. 1.7 कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 358 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर ऑक्टोबर 2026 पर्यंत 10.9 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. रेल्वेचा अधिकाधिक महसूल हा मालवाहतुकीतून होत असतो. या महिन्यात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक झाल्याचे दिसून येत आहे.
लोखंड, स्टील, मिनरल ऑईल, खते, कंटेनर लोडींग याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध झाला आहे. कर्नाटकाच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या मायनिंगच्या माध्यमातून मालवाहतुकीला चालना मिळाली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान तिकिटांची तपासणी करून 42 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध झाल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
