For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक शेअरबाजारात दक्षिण कोरीयाची आगेकुच

06:22 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक शेअरबाजारात दक्षिण कोरीयाची आगेकुच
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली : जागतिक शेअर बाजारांच्या रँकिंगमध्ये मोठा बदल होताना दिसला आहे. अलीकडेच तैवानने भारतीय शेअरबाजाराला मागे टाकले होते. आता यात पुन्हा दक्षिण कोरीयाचा एंट्री झाली असून त्यांनी भारताला मागे टाकले आहे. यायोगे दक्षिण कोरीयाचा शेअरबाजार आता जागतिक पटलावर सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.

जागतिक पटलावर आता जागतिक बाजार मूल्याच्या बाबतीत पाहता भारतीय शेअरबाजार सातव्या स्थानावर घसरला आहे. यापूर्वी तैवान शेअर बाजाराने भारताला मागे टाकले होते. आशियातील दोन्ही जागतिक शेअरबाजार हे तेजीत असल्याने त्यांनी आगेकुच केली. भारतीय शेअरबाजारात मात्र सातत्याने घसरण दिसून आली. 2026 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने विक्रीवर भर दिला. उत्पन्न घटणे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याने भारतावर दबाव दिसून आला. हेच कारण भारतीय शेअरबाजाराला रँकिंगमध्ये खाली खेचण्यासाठी पुरेसे ठरले.

Advertisement

दक्षिण कोरीयाचे बाजार भांडवलमूल्य 5.04 ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहचले तर भारताचे 4.84 ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहचलेले आहे. यापूर्वी तैवान बाजाराने भारताला 5.15 ट्रिलीयन डॉलर मूल्यासह मागे टाकले आहे. तैवान शेअर बाजार रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

एआय, सेमीकंडक्टर बुमचा फायदा

दक्षिण कोरीया व तैवानमध्ये एआय व सेमीकंडक्टर क्षेत्राच्या भरभराटीमुळे तेजी दिसली आहे. यात टीएसएमसी, सॅमसंग व एसके हिनिक्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे योगदान अलौकीक आहे.

भारतीय बाजाराच्या स्थितीची कारणे...

?बाजार घसरणीत- दुसरीकडे भारतीय शेअरबाजारावर नजर टाकल्यास स्थिती बिकट आहे. भारतात सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 12 टक्के, 15  टक्के पर्यंत घसरलेले आहेत. ही घसरण सप्टेंबर 2024 पासून सुरु आहे.

?विदेशी गुंतवणूक व दबाव- विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने विक्रीवर भर दिला आणि जागतिक स्तरावर व्यापार तणावामुळे भारतीय शेअरबाजार दबाव झेलत राहिला.

?कच्च्या तेलाचे दर- कच्च्या तेलाच्या किमती युद्धाच्या तणावात 100 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकला. याने महागाई व व्यापार तुटीची चिंता वाढवली.

?भविष्यात चिंता- हवामान विभागाने 90 टक्के सामान्य मान्सून होणार असल्याचा अंदाज वर्तवला तर जागतिक तणावाने भविष्यातील स्थितीही अनिश्चित मार्गावर असल्याचे सुचीत केलेले आहे.

Advertisement
Tags :

.