For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण कोरियाला मिळाले पहिले केएफ-21 बोरामे लढाऊ विमान

06:25 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण कोरियाला मिळाले पहिले केएफ 21 बोरामे लढाऊ विमान
Advertisement

वृत्तसंस्था, सोल

Advertisement

दक्षिण कोरियाच्या वायुदलाला स्वत:चे पहिले केएफ-21 बोरामे लढाऊ विमान प्राप्त झाले आहे. केएफ-21 लढाऊ विमानाला ‘यंग हॉक’ असे नाव देण्यात आले आहे. हे 4.5 पिढीचे बहुउद्देशीय लढाऊ विमान असून ते विविध भूमिका साकारण्यास सक्षम आहे. केएफ-21 बोरामेला 156 व्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यात येणार आहे. याचा मुख्य उद्देश जुन्या ठरलेल्या एफ-5 आणि एफ-4 फँटम विमानांना बदलणे आहे. नवी लढाऊ विमाने ताफ्यात सामील झाल्याने दक्षिण कोरियाच्या वायुदलाच्या लढाऊ क्षमतेत मोठी भर पडणार आहे.

2030 पर्यंत 100 हून अधिक केएफ-21 लढाऊ विमाने सेवेत आणण्याची दक्षिण कोरियाची योजना आहे. याकरता एक उत्पादन रोडमॅप ठरविण्यात आला आहे. ही योजना वायुदलाच्या ताफ्याच्या आधुनिकीकरणाचा महत्त्वाचा हिस्सा आहे.  कोरिया एअरोस्पेस इंडस्ट्रीजने दीर्घकाळापर्यंत या लढाऊ विमानासाठी विकासकार्य केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.