महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलियाला नमवून दक्षिण केरिया उपांत्य फेरीत

06:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

‘झोम्बी फुटबॉल’ खेळणारे म्हणून अनेकदा ज्यांचा उल्लेख होतो त्या दक्षिण कोरियाच्या फुटबॉल संघाने आशियाई चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवून आपली क्षमता दाखवून दिली आहे. कर्णधार सोन ह्युंग-मिनच्या नेतृत्वाखाली संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाने त्यांना उपांत्य फेरीत पोहोचविले आहे आणि आता जॉर्डनचा सामना त्यांना करावा लागणार आहे. दक्षिण कोरियाच्या खेळाच्या अनोख्या शैलीचे उशिरा मुसंडी आणि अतिरिक्त वेळेत सामना नेण्याकडे कल हे वैशिष्ट्या राहिले असून त्याने लक्ष वेधून घेण्याबरोबर टीकाही ओढवून घेतली आहे. दक्षिण कोरियाने शुक्रवारी अल जानोब स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अतिरिक्त वेळेत सोन ह्युंग-मिनने शानदार फ्री किकवर केलेल्या विजयी गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला नमवले. 2015 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने अतिरिक्त वेळेत दक्षिण कोरियाला याच गोलफरकाने पराभूत करून त्यांचा पहिला आशियाई चषक जिंकला होता. परंतु यावेळी दक्षिण कोरियाने ‘स्टॉपेज टाइम’मध्ये आणखी एक गोल करून सामना अतिरिक्त वेळेत नेण्यास भाग पाडले.

Advertisement

नॅथॅनियल अॅटकिन्सनच्या क्रॉसवर क्रेग गुडविनने केलेल्या गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मध्यंतरापूर्वीच आघाडी घेतली होती. दक्षिण कोरियाचा प्रशिक्षक क्लिन्समनने दुसऱ्या सत्रात डावपेचात्मक बदल करत सोनला पुढे ढकलले आणि हा डावपेच कामी आला. स्टॉपेज टाईमच्या चौथ्या मिनिटाला सोनला लुईस मिलरने गोलक्षेत्रात फाऊल केले. त्यानंतर ह्वांग ही-चॅनने गोल करत दक्षिण कोरियाचा स्पर्धेतील 90 व्या मिनिटानंतरचा चौथा गोल केला. अतिरिक्त वेळेत मिलरने पुन्हा एकदा ह्वांगच्या बाबतीत केलेल्या फाऊलमुळे गोलक्षेत्राच्या काठावर त्यांना फ्री किक मिळाली. सोनने या संधीचा फायदा घेत चेंडूला जाळीत सारले आणि दक्षिण कोरियाला पुढच्या फेरीत पोहोचविले. शुक्रवारी ताजिकिस्तानचा 1-0 असा पराभव केलेल्या जॉर्डनशी आता मंगळवारी पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाची गाठ पडेल. दक्षिण कोरियाने गट स्तरावर जॉर्डनविऊद्ध 2-2 अशी बरोबरी साधली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article