संस्थानकालीन दक्षिणमुखी श्री शनैश्वर मंदिर
कोल्हापूर :
महापालिका परिसरात संस्थानकालिन दक्षिण मुखी श्री शनैश्वर मंदिर आहे. शनि शिंगनापूर, बेंग्लोरनंतर कोल्हापुरात दक्षिणमुखी शनिमंदिर आहे. त्यामुळे श्रावण शनिवारी येथे तेल अभिषेक, पंचामृत अभिषेक घालण्यासाठी मोठी गर्दी असते. वंशपरंपरेनुसार या मंदिरातील शनिमुर्तीची पूजा, देखभाल दुरूस्तीचा अधिकार संस्थानकालापासून खालकर कुटुंबियांकडे आहे.
दक्षिणमुखी जागृत देवस्थान श्री शनैश्वर मंदिराला पावनेदोनशे वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे दरशनिवारी या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात चार शनिवारी या मंदिरात अभिषेक घालण्यासाठी मोठी गर्दी असते. वैशाख अमावस्येला शनिश्वर जयंती उत्सव साजरा केला जातो. काही शनिभक्त येथील शनिला दर शनिवारी तेल आणि नारळ अर्पण करतात. खालकर कुटुंबियांकडून सकाळ, संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते.
श्रावणातील चार शनिवारी तेल अभिषेक, पंचामृत अभिषेक, सकाळ, दुपारी आणि संध्याकाळी आरती केली जाते. संध्याकाळी सात ते नऊ शनैश्वर सुरेल संगीत भजनी मंडळाचे भजन असते. त्यानंतर रात्री नऊ वाजता आरती आणि प्रसाद वाटप केले जाते. दक्षिणमुखी मंदिर असल्याने येथे पूजा केल्याने इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात, अशी शनिभक्तांची धारणा आहे. संस्थान कालापासून या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील श्रीमंत शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती या मंदिरात दर्शनासाठी येतात.
- हेमाडपंथी दगडी पाषानात जीर्णोद्धार
श्री शनैश्वर मंदिराला 2013 मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या मंदिराचा पुन्हा हेमाड पंथी दगडी पाषानात जिर्नोधार करण्यात आला. हे बांधकाम पाहण्यासाठी अनेक अभ्यासक येतात. नक्षीकाम व वास्तू पाहून सर्वजण भारावून जातात.
- दक्षिणमुखी मंदिर
शहराच्या मध्यभागी महापालिका परिसरात दक्षिणमुखी शनिमंदिर आहे. तसेच पाषानरूपी खडी शनिमुर्ती असल्याने जागृत देवस्थान मानले जाते. शनि शिंगणापूर, बेंग्लोरनंतर कोल्हापुरात दक्षिणमुखी शनिमंदिर आहे. म्हणून संस्थान कालापासून या मंदिराला विशेष महत्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात पहाटेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी असते.