द.आफ्रिका महिला संघाची घोषणा
वृत्तसंस्था / केपटाऊन (द. आफ्रिका)
द. आफ्रिका आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये वनडे आणि टी-20 मालिका द. आफ्रिकेत 10 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान खेळविल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी द. आफ्रिकेच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. लॉरा वूलवॉर्टकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
2025 च्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेत लॉरा वूलवॉर्टच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम फेरीत भारताने द. आफ्रिकेचा पराभव करुन पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. पाक आणि द. आफ्रिका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. द. आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने आतापासूनच आपल्या संघाच्या पुनरबांधणी प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. आयसीसीची आगामी महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे होणार आहे. द. आफ्रिकेच्या महिला संघामध्ये कायला रिनेकी हा नवा चेहरा आहे. डी क्लर्क आणि कॅप यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
द. आफ्रिका टी-20 संघ: वूलवॉर्ट (कर्णधार), ब्रिट्स, डी क्लर्क, डर्कसन, हेलुबी, जाफ्ता, मेरिझान कॅप, खाका, क्लास, सुने लूस, काराबो मेसो, मलाबा, रिनेकी, ट्रायोन आणि निकर्क
द. आफ्रिका वनडे संघ : वूलवॉर्ट (कर्णधार), ब्रिट्स, डी क्लर्क, डर्कसन, गुडॉल, हेलुबी, जाफ्ता, मेरिझान कॅप, सुने लूस, काराबो मेसो, मलाबा, सेखुखुणे, शानगेस, ट्रायोन आणि ट्युनीक्लिफ