For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण आफ्रिकेची लढत आज नेदरलँड्सशी

06:42 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण आफ्रिकेची लढत आज नेदरलँड्सशी
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलेले असले, तरी न्यूयॉर्कमध्ये आज शनिवारी होणाऱ्या त्यांच्या गट ‘ड’मधील दुसऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर नेदरलँड्सच्या ऊपाने एक धक्का देण्याची क्षमता बाळगणारा प्रतिस्पर्धी असेल. गेल्या वर्षीच्या 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषकात डच संघाविऊद्ध 38 धावांनी झालेल्या पराभवाचे चटके दक्षिण आफ्रिका संघाच्या मनात अजूनही ताजे असतील.

एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील संघाला यावेळी नक्कीच पलटवार हवा असेल.  श्रीलंकेविऊद्धच्या त्यांच्या विजयातील सर्वांत उत्साहवर्धक घडामोड एन्रिक नॉर्टजेसंबंथी राहिलेली असून या वेगवान गोलंदाजाने न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर श्रीलंकेविरुद्ध चार बळी घेत आपली लय परत मिळविल्याचे दिसते. कागिसो रबाडासोबत नॉर्टजे एक प्रभावी समीकरण आहे. दुसरीकडे नेदरलँड्सने नेपाळवर सहा गडी राखून विजय मिळवून सुऊवात केलेली आहे.

Advertisement

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.