तिरंगी मालिकेतून द. आफ्रिकेला विश्वचषक तयारीची संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदा होणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठीची आपली तयारी वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेला श्रीलंका आणि भारतविऊद्धची तिरंगी मालिका लाभदायी ठरण्याची आशा आहे. दक्षिण आफ्रिका संघ पुढच्या महिन्यात एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार आहे.
तिरंगी मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केले जातील आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मंडला माशिम्बी यांनी या वर्षीच्या विश्वचषकापूर्वी त्यांच्या संघासाठी ही चांगली परीक्षा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला केला आहे. जेव्हा तुम्ही भारत आणि श्रीलंकेचा सामना त्यांच्या घरच्या परिस्थितीत करता तेव्हा अशा परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे ते तुम्हाला समजू शकते, असे माशिम्बी यांनी म्हटले आहे.
‘विश्वचषकासाठी योग्य संघरचना पडताळून पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या दौऱ्यामुळे आम्हाला त्या परिस्थितीत कोणती रचना सर्वोत्तम ठरते हे तपासून पाहण्याची संधी मिळेल’, असेही माशिम्बी यांनी सांगितले. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या बाद टप्प्यात दक्षिण आफ्रिकेने प्रवेश केला होता. परंतु उपांत्य फेरीत इंग्लंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक : रविवार 27 एप्रिल-श्रीलंका विऊद्ध भारत, मंगळवार 29 एप्रिल-भारत विऊद्ध दक्षिण आफ्रिका, गुऊवार 1 मे-श्रीलंका विऊद्ध दक्षिण आफ्रिका, रविवार 4 मे-श्रीलंका विऊद्ध भारत, मंगळवार 6 मे-दक्षिण आफ्रिका विऊद्ध भारत, गुऊवार 8 मे-श्रीलंका विऊद्ध दक्षिण आफ्रिका, रविवार 11 मे-अंतिम सामना.