For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वेसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

06:05 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वेसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टी-20 विश्वचषकातील आज रविवारी होणाऱ्या आपल्या शेवटच्या सुपर 8 सामन्यात झिम्बाब्वेला कुशल दक्षिण आफ्रिकेविऊद्ध खेळताना गोलंदाजीतील संघर्ष सुधारावा लागेल. झिम्बाब्वे त्यांच्या उत्साही मोहिमेचा शेवट उच्च पातळीवर करण्याचा प्रयत्न करेल. गटात अव्वल स्थानावर पोहोचणे हा झिम्बाब्वेच्या यशोगाथेचा एक भाग होता आणि त्यांचा कर्णधार सिकंदर रझा याच्या प्रेरणेने ते दक्षिण आफ्रिकेला जोरदार झुंज देण्याचा दृढनिश्चय निश्चितच करतील.

दक्षिण आफ्रिका हा आयसीसीच्या या स्पर्धेत पराभूत करण्यास सर्वांत कठीण संघ आहे आणि जर झिम्बाब्वेला त्यांना आव्हान द्यायचे असेल, तर वेस्ट इंडिज आणि भारताविऊद्धच्या मागील दोन सुपर 8 सामन्यांमध्ये 250 पेक्षा जास्त धावा दिल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. रझाला माहित आहे की, जर त्यांनी तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली, तरच ते मोठ्या संघांशी स्पर्धा करू शकतात.

Advertisement

सुपर 8 टप्प्यात झिम्बाब्वेने खूप जास्त प्रमाणात खराब चेंडू टाकलेले आहेत. त्यांना गट टप्प्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविऊद्ध दाखवलेल्या शिस्तीने गोलंदाजी करावी लागेल. गट टप्प्यात त्यांचा अपराजित प्रवास श्रीलंकेच्या संथ खेळपट्ट्यांवर घडला, परंतु मुंबई आणि चेन्नईमध्ये त्यांनी ज्याचा अनुभव घेतला त्या फलंदाजीला अनुकूल भारतीय परिस्थितीत चुकांना फारच कमी वाव आहे. फलंदाजीच्या आघाडीवर ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे माऊमानी या सलामीवीर जोडीने पॉवरप्लेचा जास्तीत जास्त फायदा उठविण्याची आवश्यकता आहे.

स्पर्धेत अद्याप बाद न झालेल्या बेनेटने भारताविऊद्ध दाखवून दिले की, तो षटकार देखील चांगल्या प्रकारे खेचू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्याविरुद्ध त्याला ठामपणे उभे राहण्याचा मार्ग शोधावा लागेल. मार्को जॅनसेन आणि लुंगी एनगिडी (प्रत्येकी 11 बळी) हे दक्षिण आफ्रिकेसाठी उत्कृष्ट गोलंदाज ठरलेले आहेत आणि त्यांना वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, कॉर्बिन बॉश आणि आघाडीचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी चांगली साथ दिली आहे. कर्णधार एडन मार्करम, क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन हे पहिले तीन फलंदाज देखील फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी रझा आणि त्याच्या संघाला गोलंदाजीत विशेष प्रयत्न करावे लागतील. डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेव्हिससह मधल्या फळीनेही सुपर 8 मध्ये प्रभाव पाडला आहे.

सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.

Advertisement
Tags :

.