For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेक प्रजासत्ताकशी द.आफ्रिकेची बरोबरी

06:45 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
झेक प्रजासत्ताकशी द आफ्रिकेची बरोबरी
Advertisement

वृत्तसंस्था, अॅटलांटा

Advertisement

येथे झालेल्या फिफा विश्वचषक फुटबॉलमधील सामन्यात झेक प्रजासत्ताकला 1-1 असे गोलबरोबरीत रोखत दक्षिण आफ्रिकेने आपल्या आशा जिवंत ठेवल्या. सामन्याच्या उत्तरार्धात थापेलो मासेकाने लांबवरून मारलेला फटका पेनल्टी क्षेत्रात झेक प्रजासत्ताकच्या पावेल सुल्कच्या हाताला लागला. त्यावर मिळालेल्या पेनल्टीवर तेबोहो मोकोएनाने गोल नोंदवत बरोबरी साधली. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना मोकोएनाच्या गालावरून अश्रू ओघळताना दिसले होते. त्यानंतर त्याने पेनल्टी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आणि 83 व्या मिनिटाला जमिनीलगतचा फटका मारत झेक प्रजासत्ताकचा गोलरक्षक मातेज कोवर याला चकवून गोल केला.

या सामन्यात सहाव्याच मिनिटाला मायकेल सादिलेकने झेक प्रजासत्ताकला आघाडी मिळवून दिली होती. यासाठी अलेक्झांडर सोयकाने सादिलेकला पास पुरविला होता आणि त्याने गोलरक्षक रोनवेन विल्यम्सला चकवून चेंडू जाळ्यात मारला. दोन्ही संघांना त्यांच्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आणखी एका पराभवाचा फटका बसल्यास पुढील फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशांना गंभीर धक्का बसू शकतो, याची दोन्ही संघांना जाणीव होती.

Advertisement

मेक्सिकोकडून पराभव झाल्यानंतर बाद फेरीत कधीही प्रवेश न करण्याची दक्षिण आफ्रिकेची मालिका अखंड राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता द.आफ्रिकेचा पुढील सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. मात्र या सामन्यात मोकोएना खेळू शकणार नाही. कारण त्याला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड मिळाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.