For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सौरव गांगुलीला स्थान

06:31 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सौरव गांगुलीला स्थान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी सांगितले की, ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये स्थान मिळणे हा एक मोठा सन्मान आहे आणि त्याने आयसीसी व अध्यक्ष जय शाह यांचे आभार मानले. ‘एक्स‘वरील एका पोस्टमध्ये गांगुली म्हणाला की, काही महान नावांच्या पंक्तीत सामील होणे हे अद्भुत आहे. मला ‘हॉल ऑफ फेम‘ मध्ये स्थान दिल्याबद्दल आयसीसी आणि अध्यक्ष जय शाह यांचे आभार. हा एक मोठा सन्मान आहे. आतापर्यंत ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये स्थान मिळालेल्या 10 भारतीयांपैकी मी एक आहे. काही महान नावांच्या पंक्तीत सामील होणे अद्भुत आहे, असे गांगुलीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. हा निर्णय गांगुलीच्या 54 व्या वाढदिवसादिवशीच घेण्यात आला.

आयसीसीने अद्याप या निर्णयाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, आयसीसी हॉल ऑफ फेम, क्रिकेटच्या समृद्ध आणि चैतन्यमय इतिहासाला आकार देणाऱ्या महान क्रिकेटपटूंच्या असाधारण कामगिरीचा गौरव करते. खेळाडू त्यांच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर पाच वर्षांनीच यात समाविष्ट होण्यास पात्र ठरतात. आयसीसी हॉल ऑफ फेमची सुरुवात जानेवारी 2009 मध्ये आयसीसीच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून झाली होती आणि तेव्हापासून या खेळाला शोभा देणाऱ्या सर्व महान खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.