महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्रावर फेकले सूप

06:24 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी आंदोलनादरम्यान फ्रान्समध्ये गोंधळ

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

फ्रान्समध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लौवर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकले आहे. हे चित्र बुलेटप्रूफ काचेत संरक्षित करण्यात आले असल्याने त्याचे थेट स्वरुपात कुठलेच नुकसान झालेले नाही.

या निदर्शकांनी कृषी प्रणालीत बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. चित्रावर सूप फेकण्याची घटना घडल्यावर म्युझियममध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पेंटिंगला सुरक्षित करत त्वरित कारवाई केली आहे. पॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली आहे. इंधन दरवाढ रोखण्याची आणि नियम सुलभ करण्याच्या मागणीवरून फ्रान्समधील शेतकरीवर्ग आंदोलन करत आहे.

कधी अॅसिड तर कधी केक

मोनालिसाच्या चित्राला 1950 च्या दशकापासून बुलेटप्रूफ ग्लासची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या चित्रावर एका व्यक्तीने अॅसिड फेकले होते, यामुळे या चित्राचे नुकसानही झाले होते. यानंतरच बुलेटप्रूफ ग्लास बसविण्याचे पाऊल उचलण्यात आले होते. 2022 मध्ये एका कार्यकर्त्याने या चित्रावर केक फेकून ‘पृथ्वीविषयी विचार’ करण्याचे आवाहन केले होते.

1911 मध्ये झाली होती चोरी

ऐतिहासिक घटनांमध्ये 1911 साली म्युझियमचा कर्मचारी विन्सेजो पेरुगियाने लौवर म्युझियममधून या चित्राची चोरी केली होती. हे चित्र 1913 मध्ये हस्तगत झाले होते, तेव्हा इटलीच्या एका बाजारात हे चित्र विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या चोरीच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती

Advertisement
Next Article