कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'बाप्पां'च्या आगमनाला ‘साऊंड’च वाजणार

12:01 PM Jul 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर /  धीरज बरगे :

Advertisement

यंदाही गणेश आगमन मिरवणुकीमध्ये  ‘साऊंड’च वाजणार आहे. 'बाप्पां'च्या स्वागतासाठी बहुतांश तालीम मंडळांनी साऊंड सिस्टीमला पसंती दिली आहे. परिणामी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील नामांकित साऊंडचे महिनाभरापुर्वीच बुकींग फुल्ल झाले आहे. त्यामुळे साऊंड सिस्टीमसह या व्यवसायावर अवलंबून अन्य व्यवसायिकांचे गणेशोत्सवात महत्त्व वाढले आहे.

Advertisement

गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. शहरातील तालीम, मंडळांमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे.  कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या नियोजनात व्यस्त आहेत. मंडळांकडून गणेश आगमन मिरवणुकीचे नियोजन सुरु आहे.  ऑगस्ट  सुरुवातीपासूनच मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात होणार आहे.  25 ते 27 ऑगस्ट दरम्यान बहुतांश तालीम मंडळांच्या आगमन मिरवणुका निघणार आहेत. केवळ आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर सुमारे 15 ते 20 कोटींच्या घरात खर्च होत असलायचे चित्र आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने यंदाचा गणेशोत्सव मोठयाप्रमाणात साजरा होणार आहे. निवडणुक लढण्यास इच्छुक असणाऱ्या वर्गणीदारांची कमी नसल्याने गणेश मंडळांनीही आगमन, विसर्जन मिरवणुकीचे भव्य-दिव्य नियोजन केले आहे. यामध्ये बहुतांश मंडळांनी साऊंड सिस्टीमचे बुकींग केले आहे. कोल्हापूरसह पुणे, कराड, रायगड यासह अन्य जिल्ह्यातील नामांकित साऊंडचे बुकींग मंडळांनी केले आत्ताच केले आहे. त्यामुळे आगमन मिरवणुकीसाठी 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान बहुतांश साऊंडचे बुकींग फुल्ल झाले आहे.

साऊंड सिस्टीमला मागणी वाढल्याने साऊड सिस्टींमच्या भाड्यामध्येही वाढ झाली आहे. आगमन मिरवणुकीसाठी साधारणत: 70 हजारापासून दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत भाडे आकारणी केली जात आहे. तर अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिवरणुकीसाठी नामांकित साऊंड सिस्टीम व्यवसायिकांकडुन चार लाखांपर्यंत भाडे सांगितले जात आहे.

साऊंड सिस्टीमला मागणी वाढल्याने या व्यवसायावर अधारीत अन्य व्यवसायिकांना यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अच्छे दिन आले आहेत. साऊड सिस्टीमसह आकर्षक विद्युत रोषणाईवरही मंडळांचा भर असतो. त्यामुळे लाईट व्यवसायिकांनाही मागणी वाढली आहे. तसेच जनरेटर, साऊंड सिस्टीम ऑपरेटर यांचेही भाव वधारले आहेत.

गणेशोत्सवाचा उत्साह आत्तापासुन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव निर्बंधमुक्त केला असला तरी साऊंड सिस्टीमबाबत काही कायदे आहेत. मात्र सार्वजनिक सण, उत्सव, महापूरुषांची जयंती मिवरणुकीमध्ये साऊंड सिस्टीमबाबतच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दोन बेस दोन टॉपवरुन मंडळे आता चार बेस, चार टॉपचे नियोजन करत आहेत. उत्सव साजरा करताना उत्साह असावा मात्र अतिउत्साह नसावा. साऊंड सिस्टीमच्या आवाजावर मर्यादा असणे आवश्यक आहे.

साऊंड सिस्टीम व्यवसायिक 700 हून अधिक

लाईट व्यवसायिक सुमारे 600

जनरेटर व्यवसायिक सुमारे 150

एलईडी स्क्रीन व्यवसायिक सुमारे 70 ते 80

साऊंड सिस्टीम ऑपरेटर सुमारे 700

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article