For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोरेन यांच्या जामिनावर 6 मे रोजी सुनावणी

06:40 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोरेन यांच्या जामिनावर 6 मे रोजी सुनावणी
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जमीन घोटाळ्याप्रकरणी तुऊंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांनी जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने त्यांना अटक केली होती. मात्र, आता त्यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अटकेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. आता हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. याबाबत आता ईडीला उत्तर द्यायचे आहे. सोरेन यांनी आपल्या याचिकेत अंतरिम जामीन मागितला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे.

Advertisement

हेमंत सोरेन यांची याचिका न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आलेली आहे. नुकतेच हेमंत सोरेन यांच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली. न्यायालय अद्याप निर्णय देत नसल्याने हेमंत सोरेन निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत, असेही सांगण्यात आले.

रांचीच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांनी आपल्या काकांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पीएमएलए न्यायालयात 13 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हेमंत सोरेन यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

Advertisement
Tags :

.