‘स्टील’ वेबसीरिजमध्ये सोफी टर्नर
स्टील ही 6 एपिसोड्स असलेली थ्रिलर सीरिज असून यात सोफी टर्नर ही हॉलिवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. तणावपूर्ण, सामाजिक ड्रामाच्या स्वरुपात सादर करण्यात आलेली ही सीरिज पैशाचे महत्त्व, गुन्हे, वाढती महागाई आणि आयुष्य पणाला लागलेले असताना समोर येणाऱ्या दुविधा यासारख्या विषयांना स्पर्श करणारी आहे.
निराशा लालसेच्या संपर्कात आल्यावर दैनंदिन जीवन अशा वळणाला सामोरे जाते, जेथून परतणे अशक्य असते. या सीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला असून यात सोफी ही जाराच्या भूमिकेत दिसून येते, जी एका सामान्य ऑफिसची कर्मचारी आहे. सह-कर्मचाऱ्यांसोबत बोअर होण्यापासून टाळण्याच्या प्रयत्नात तिचे जीवन काही क्षणात बदलून जाते. बंदुकधाऱ्यांचा एक समूह ऑफिसमध्ये शिरतो आणि जारा आणि तिच्या सह-कर्मचाऱ्यांना एक धोकादायक अल्टीमेटम देतो. 4 अब्ज जमवा किंवा जीवघेण्या परिणामांना सामोरे जा अशी धमकी मिळते. यानंतर वातावरण धोकादायक होते, जेथे भय, नैतिक तडजोड आणि जिवंत राहण्याची भावना वरचढ ठरते आणि जाराचे सामान्य आयुष्य अत्यंत वाईट काळाला सामोरे जात असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
ही वेबसीरिज 21 जानेवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सोफीसोबत या सीरिजमध्ये आर्ची मेडकवे, जॅकब फॉर्च्यून-लॉयड दिसून येणार आहे. स्टील सीरिजचे दिग्दर्शन सॅम मिलर आणि हेटी मॅकडोनाल्ड यांनी केले आहे.