For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वन्यप्राण्यांच्या स्थलांतराबाबत लवकरच तोडगा : वनमंत्री खंड्रे

11:00 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
वन्यप्राण्यांच्या स्थलांतराबाबत लवकरच तोडगा   वनमंत्री खंड्रे
Advertisement

बेळगाव : वन-जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौधमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत कोडगु, चिक्कमंगळूर, हासन जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली. कोडगु, चिक्कमंगळूर आणि हासन जिल्ह्यात हत्ती, वाघ, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जनतेला त्रास होऊ लागला आहे. दरम्यान नागरिकांनी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान अधिवेशनासाठी आलेल्या वनमंत्र्यांनी तातडीने स्वतंत्र बैठक बोलावून हत्तींच्या स्थलांतराबाबत आमदारांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार ए. एस. पोनण्णावर यांनीही कोडगु जिल्ह्यात हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट केले. यावेळी उर्जामंत्री के. के. जॉर्ज, लघुपाटबंधारे मंत्री एन. एस. बोसराजू, चिक्कमंगळूरचे आमदार तिमय्या, श्रृंगेरीचे आमदार देवराजू गौडा यांसह इतर आमदार उपस्थित होते. यावेळी 9 वेळा म्हैसूर येथील अंबारी वाहणाऱ्या अर्जुन हत्तीचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.