For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहार एन्काउंटरमध्ये सोनू यादव ठार

06:12 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहार एन्काउंटरमध्ये सोनू यादव ठार
Advertisement

भाजप नेत्याच्या पुतण्याचा मारेकरी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिवान

बिहारमध्ये गुन्हेगारांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच आहे. रविवारी सकाळी सिवान जिह्यात झालेल्या चकमकीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या कुप्रसिद्ध हर्ष सिंह हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनू यादव चकमकीत ठार झाला आहे. यापूर्वी इतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

बिहारमधील सिवानमध्ये भाजप नेते आणि माजी आमदार मनोज सिंह यांचा पुतण्या हर्ष सिंह याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये सोनू यादव याचाही समावेश होता. गुन्हेगार सोनू यादव रविवारी पहाटे पोलिसांसोबत झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी रविवारी पहाटे सिवान पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. या गोळीबारात मुख्य आरोपी सोनू यादव मारला गेला. सोनू यादव हा हुसैंगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरेया येथील रहिवासी होता. पोलीस काही काळापासून त्याचा शोध घेत होते. रविवारी सकाळी त्याला घेरल्यानंतर झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

Advertisement
Tags :

.