पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर सोनू निगम यांची नाराजी व्यक्त
मुंबई
केंद्र सरकारतर्फे नुकतीच पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या घोषणेनंतर गायक सोनू निगम यांनी सोशल मिडीयावर नाराजी जाहीर केली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सुद्धा काही कलाकारांना अद्याप पद्म पुरस्कार मिळाला नाही आहे, असे गायक सोनू निगम यांनी या व्हिडीओद्वारे सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर मात्र गायक सोनू निगम यांनी सोशल मिडीयाद्वारे नाराजी व्यक्त केली. सोनू निगम यांनी या नाराजीबद्दल भाष्य करत एक व्हीडीओ सोशल मिडीयावर शेअर केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी किशोर कुमार, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या गायकांना अजूनही पुरस्कार का देण्या आले नाही असा सवाल केला आले.
या व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणाले, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार हे असे दोन गायक आहेत, ज्यांनी जगभरातील गायकांना प्रेरण दिली. मोहम्मद रफी साहेब यांना पद्मश्री पुरस्कारावरचं संपवलं तर किशोर कुमार यांच्या नशिबी तर मरणोत्तर पुरस्कारही मिळाला नाही. गायिका श्रेया घोषाल या अनेक वर्षांपासून आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. गायिका सुनिधी चौहन यांनी तर वेगळ्या आवाजाने संपूर्ण पिढीला गायनाची प्रेरणा दिली आहे. यांना अद्याप पुरस्कार मिळालेला नाही. गायन क्षेत्रासोबत, अभिनय, विज्ञान, साहित्या अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ज्यांना न्याय मिळाला नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला सांगून आमच्या ज्ञानात भरा पाडा, असे सोनू निगम या व्हिडीओ द्वारे म्हणाले.