महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सोनिया गांधी मलाच मुख्यमंत्री करणार!

05:10 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोमाटिरेड्डी यांचा व्हिडिओ व्हायरल : काँग्रेस पक्ष तेलंगणात अडचणीत

Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभा खासदार कोमाटिरेड्डी व्यंकट रेड्डी यांनी पक्ष विधानसभा निवडणुकीत जिंकल्यास सोनिया गांधी मलाच मुख्यमंत्रिपद देणार असल्याचा दावा केला आहे. नलगोंडाचे खासदार कोमाटिरेड्डी व्यंकट रेड्डी यांनी स्वत:च्या मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना हा दावा केल्याने काँग्रेस पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे.

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत काँग्रेस नेता आत्मविश्वासाने मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:चा दावा करत असल्याचे दिसून येते. पक्ष सत्तेवर आल्यास सोनिया गांधी मलाच मुख्यमंत्रिपद देणार आहेत. राज्यात माझ्याहून कुणीच वरिष्ठ नसल्याचे रे•ाr हे तेलगू भाषेत सांगत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.

तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर फैलावत आहेत. काँग्रेस पक्षात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सोनिया गांधी यांचा मोठा प्रभाव आहे, परंतु देशातील सर्वात जुन्या पक्षाने आगामी तेलंगणा निवडणुकीसाठी स्वत:च्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करणे प्रकर्षाने टाळले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article