For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनेतारण सुरक्षेचा मुद्दा

06:22 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनेतारण सुरक्षेचा मुद्दा
Advertisement

राजापूर तालुक्यात एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनेतारण कर्ज व्यवहार अत्यंत धोकादायक अवस्थेत चालवला जात असल्याचे चित्र पुढे उभे राहिले आह़े पतसंस्थांकडे ठेव रूपाने जमा झालेली रक्कम लोकांकडून सोन्याचे तारण घेऊन कर्जाऊ दिली जात़े  एका प्रकरणात साडेचार कोटी रूपयांचे सोने चोरट्यांनी पळविल़े  तर दुसऱ्या प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने तारण म्हणून ठेवून पतसंस्था, बँकांकडून कोट्यावधी रूपये उचलले गेल़े  या सगळ्या प्रकारात सामान्य जनतेने विश्वासाने ठेवलेली रक्कम धोक्यात आली आह़े  सरकारी यंत्रणा मात्र त्यासाऱ्याकडे फार गांभीर्याने बघण्यास तयार नाह़ी  पोलिसांनी मात्र काही आशादायक पावले उचलली आहेत़

Advertisement

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत राजापुरातील एका चोरीची चौकशी सुरू होती. त्यादरम्यान नकली सोन्याद्वारे कर्ज काढून पतसंस्था, बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणी  चौघांना अटक केल़ी पोलिसांनी कोल्हापूर येथील सोनार यांच्यासह चौघांना संशयित म्हणून अटक केल़ी कोल्हापूरच्या सोनाराने दिल्लीहून ऑनलाईन नकली दागिने मागविले. या नकली दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देऊन ते खरे दागिने असल्याचे भासविले. परंतु त्याचे वितरण करायचे कसे, असा प्रश्न होता. त्यासाठी त्याने योजना आखल़ी काही पतसंस्था व बँका ज्या सोने तारण कर्ज व्यवहार करत आहेत़ त्यांच्याकडे बनावट दागिने ठेवून कर्ज केल्यास मोठा फायदा होईल असा विचार केल़ा त्यातून तयार झालेल्या योजनेत सोनाराला तोळ्याला 20 हजार तर उर्वरित 25 हजार दोघा साथीदारांना मिळत होते. अशा प्रकारच्या डिलींगद्वारे कोट्यावधीची माया या गुन्ह्यातील चौकटीने गोळा केल्याचे पोलीस तपासात पुढे आल़े

नकली दागिने भंडारी खारवी समाज पतसंस्था, मलकापूर अर्बन बॅंक, खंडाळा अर्बन, राजापूर कुणबी पतसंस्था, पावसमधील बॅंक ऑफ इंडिया, मिठगवाणेतील श्रमिक पतसंस्थेमध्ये हे दागिने गहाण ठेवण्यात आलेले होते. गेल्या वर्षभरात सुमारे 300 तोळे दागिने गहाण ठेऊन साडेतीन कोटी ऊपये त्यांनी कर्ज उचलल्याचे तपासात पुढे आले आहे. पूर्वी पतसंस्था किंवा बॅंकांचे सोनार दागिन्यांचा तुकडा पाडून खात्री करून ते गहाण ठेवत होते. परंतु अलीकडे बॅंका किंवा पतसंस्थेचे सोनार दागिना दगडावर घासून भिंगाने तपासून घेतात. त्यामुळे या सोनारांची फसगत झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Advertisement

सर्व पतसंस्थाचालकांची महत्त्वाची बैठक सोमवारी रत्नागिरीत पार पडली. त्यामध्ये प्रामुख्याने सोने किंवा पैशांच्या सुरक्षेबाबत संस्थांकडून अपेक्षित खबरदारी किंवा सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. या विषयाकडे पोलिसांनी लक्ष वेधल़े त्यामुळे आरबीआयच्या निकषानुसार संस्था किंवा बॅंकांनी सुरक्षा व्यवस्था करावी, अशा सक्त सूचना जिल्हा पोलिसांनी संस्थाचालकांना दिल्य़ा

याशिवाय आणखी एका प्रकरणामध्ये राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील एका चोरट्याने डल्ला मारला. थोडे थोडके नव्हे तर तब्बल साडेचार कोटी रुपयांचे सोने चोरट्यांनी चोरुन नेल़े वेल्डींगसाठी वापरण्यात येणाऱ्या कटरची मदत त्यासाठी घेण्यात आल़ी हे काम व्यावसायिक चोरट्यांनी केले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल़ा चोरी होण्यापूर्वी चोरट्यांनी तपशीलवारपणे पतसंस्थेची माहिती घेतल़ी त्याचबरोबर सोनेसाठ्याची देखील माहिती घेतल़ी बक्कळ ऐवज हाती लागेल असे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी कार्यभाग साधला, असा अंदाज तपास अधिकारी व्यक्त करत आहेत़ गुन्हेगारांनी घटनास्थळी सोडलेल्या अवशेषांच्या आधारे पोलीस गैरकृत्य करणाऱ्यांपर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आल़ा

पतसंस्था, बँका वगैरे आर्थिक आस्थापनांमध्ये लोकांनी मोठ्या विश्वासाच्या आधारे आपली कमाई ठेवलेली असत़े आपल्या कमाईवर चांगले व्याज मिळेल आणि रक्कम सुरक्षित राहील अशी अपेक्षा असत़े बँका किंवा पतसंस्था यांच्या लौकिकाचा आधार घेउढन लोक अशा संस्थांमध्ये पैसे ठेवत असतात़ ग्राहकांकडून जमा झालेल्या ठेवी कर्ज रुपाने लोकांना देण्याचे काम या आर्थिक आस्थापना करत असतात़ बनावट सोने तारण म्हणून ठेऊन रक्कम दिली गेल्यास कर्ज वसुली होणे अवघड असत़े अशावेळी आर्थिक आस्थापनेच्या पदरी बनावट सोने असत़े शिवाय कर्ज म्हणून रक्कम दिली गेलेली असत़े एकिकडे कर्ज वसुली अडचणीत सापडलेली असते तर दुसऱ्या बाजूला पदरी फारसे मुल्य नसलेले दागिने शिल्लक असतात़ या सगळ्यात ठेवीदारांच्या पैशांच्या भवितव्यावर प्रश्न उभा राहत़ो कोणत्याही बँकेच्या किंवा पतसंस्थेच्या स्वनिधीचे प्रमाण अल्प असत़े अधिक प्रमाण हे ठेवीतून उभारलेल्या निधीचे असत़े कर्ज वसुली अडचणीत आली तर ठेवीदारांच्या रकमा धोक्यात सापडतात़

बँक किंवा पतसंस्थेच्या ताब्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेले तरीही ठेवीदार अडचणीत सापडू शकतात़ तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांना संरक्षण मिळाव़े विमा उतरवणे अत्यावश्यक ठरवले गेले आह़े पतसंस्था असा विमा काढतात देखील पण तारण म्हणून ताब्यात असलेल्या सोन्याच्या तत्कालीन मूल्याच्या आधारे हा विमा ठरवला जात़ो सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत असत़े चोरीस गेलेले सोने आणि काढण्यात आलेला विमा यांच्या किंमतीचा मेळ बसत नाह़ी अनेकदा विमा कमी आणि चोरीस गेलेल्या सोन्याची किंमत अधिक असा प्रकार होत़ो यावेळी ठेवीदारांच्या रकमा धोक्यात येऊ शकतात़ राजापूरच्या सोने चोरी प्रकरणात हीच बाब ठळकपणे पुढे आली आह़े

पतसंस्थांच्या कारभाराची नोंदणी व परवानगी सहकार खाते देत असत़े सगळ्या अर्थाने नियमन करण्याचे काम हे खाते करत असत़े सोनेतारण कर्ज व्यवहार आणि त्यासाठी घ्यायची सुरक्षितता यावर अधिक संवेदनशील आणि नियंत्रण असणे आवश्यक आह़े पण जिल्ह्यामध्ये किती पतसंस्था सोनेतारण कर्ज व्यवहार करतात, किती प्रमाणात असा कर्ज व्यवहार झाला आहे, याची माहिती सहकार खात्याकडे नाह़ी पतसंस्थांमध्ये सोन्याच्या रुपाने किती जोखीम आहे, याची माहिती संबंधित पोलीस स्थानकात देखील नसत़े सीसीटीव्ही, भक्कम तिजोरी, रखवालदार, चोरी झाल्यास संदेश यंत्रणा अशा कितीतरी मुद्यांवर पतसंस्थांवर दुर्लक्ष होत असत़े याकडे सहकार खातेदेखील कानाडोळा करत़े

ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सोने तारण विषयक सुचवलेल्या उपाययोजना पतसंस्थांनी देखील अवलंबाव्यात असे पोलिसांनी म्हटले आह़े राजापूरमध्ये कोट्यावधी रुपयांची चोरी अथवा बनावट दागिन्यांच्या आधारे उचललेले कोट्यावधीचे कर्ज हे मुद्दे बँका विशिष्ट पतसंस्थांना धोक्याची सूचना देणारे आहेत़ पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे पतसंस्थांनी अधिक काळजीपूर्वक सुरक्षा उपाय योजले तरच तारण म्हणून स्वीकारले गेलेले सोने सुरक्षित राहील़ पर्यायाने जनतेचे दागिने आणि ठेवी विश्वासार्ह व्यवस्थेमध्ये टिकून राहतील़

सुकांत चक्रदेव

Advertisement
Tags :

.