For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनम वांगचुक करणार आमरण उपोषण

06:30 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनम वांगचुक करणार आमरण उपोषण
Advertisement

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी : केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ लेह

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि घटनात्मक सुरक्षा प्रदान करण्याच्या मागणीवरून लेहमध्ये चालू महिन्यात सलग दोन दिवस निदर्शने झाली होती. लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी या मागण्यांच्या समर्थनार्थ उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

वांगचुक हे मंगळवारपासून उपोषण करणार होते, परंतु 19 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारसोबत चर्चा झाल्यावर आता ते याच्या परिणामांची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाची मी प्रतीक्षा करत आहे. 26 फेब्रुवारी रोजी आम्ही लेह येथे सभा बोलाविली आहे. त्यावेळी एक तर आम्ही केंद्र सरकारचे आभार मानू किंवा आमरण उपोषण सुरू करू असे वांगचुक यांनी म्हटले आहे.

लडाखमधील लोकांच्या मागण्यांवरून केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती, एपेक्स बॉडी ऑफ लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सच्या (केडीए) 14 सदस्यीय शिष्टमंडळादरम्यान बैठक झाली होती. यात मागण्यांसंबंधी पुढील चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी या समितीची बैठक होणार आहे.

2019 मध्ये केंद्रशासित प्रदेश

लडाखमध्ये अनेक संघटनांनी दशकांपासून या क्षेत्राला एक स्वतंत्र केंद्रशासितप dरदेशाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. ही मागणी 5 ऑगस्ट 2019 रोजी पूर्ण झाली होती. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 च्या तरतुदी केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्दबातल ठरविल्या होत्या. याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती

Advertisement
Tags :

.