For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवाजुद्दीन सोबत दिसणार सोनम

06:15 AM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवाजुद्दीन सोबत दिसणार सोनम
Advertisement

नवाजुद्दीन सिद्दीकी हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार आहे, त्याने स्वत:च्या वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु आता नवाजुद्दीन हा पंजाबी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम बाजवा मुख्य भूमिकेत असणार आहे.

Advertisement

सोनमला पंजाबी चित्रपटसृष्टीतील कॅटरीना कैफ या नावाने ओळखले जाते. सोनमने पंजाबी चित्रपटसृष्टीसोबत बॉलिवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आता तिला नवाजुद्दीनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सोनमने 2013 साली पंजाबी चित्रपट ‘बेस्ट ऑफ लक’द्वारे कारकीर्दीला प्रारंभ केला होता. त्यानंतर ‘सरदारजी 2’, ‘सुपर सिंह’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तर नवाजुद्दीन हा यापूर्वी ‘मैं अॅक्टर नहीं हूं’ या चित्रपटात दिसून आला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.