For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडमध्ये परतणार सोनम कपूर

06:46 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये परतणार सोनम कपूर
Advertisement

पुढील वर्षी सुरू करणार चित्रिकरण

Advertisement

सोनम कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर अभिनेत्री आहे. तिला ‘रांझणा’, ‘नीरजा’ इत्यादी चित्रपटांसाठी ओळखले जाते. सोनम कपूर ही दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिने मातृत्वाच्या ब्रेकनंतर कुठलाही चित्रपट स्वीकारलेला नाही. सोनम ही यापूर्वी 2023 मध्ये ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाचे चित्रिकरण तिने खूप आधी केले होते.

सोनम कपूर आता पुत्र वायूच्या जन्मानंतर पुन्हा एकदा कॅमेऱ्याला सामोरी जाणार आहे. अलिकडेच तिने स्वत:च्या आगामी प्रोजेक्ट्संबंधी उत्सुकता व्यक्त करत अभिनयाबद्दलचे प्रेम देखील दाखवून दिले आहे.

Advertisement

सोनम लवकरच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. मी पुत्राला जन्म दिल्यावर पुन्हा एकदा कॅमेऱ्याला सामोरी जाण्यास उत्सुक आहे. मला अभिनय पसंत आहे. मी माझ्या पेशाच्या माध्यमातून अनेक कंगोरे असलेल्या व्यक्तिरेखा जगू इच्छिते. मी वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांमुळे प्रेरित होते आणि मला वेगवेगळ्या भूमिका साकारणे पसंत असल्याचे सोनमने म्हटले आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी मी एका प्रोजेक्टचे चित्रिकरण सुरू करणार आहे. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसंबंधी सध्या अधिक माहिती देता येणार नसल्याचे तिने सांगितले आहे.  ओटीटीवर स्ट्रीम होणारी ही बिगबजेट सीरिजमध्ये ती काम करणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.