सोनम-हिमांशू यांना नेमबाजीत कांस्य
► वृत्तसंस्था, हांगझोयु
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक पिस्तुल- रायफल-शॉटगन नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचे नेमबाज सोनम मस्कर आणि हिमांशू धिल्लाँ यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळविली आहेत.
10 मी. एअररायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सोनम मस्करने 317.2 तर हिमांशु धिल्लाँने 317.4 गुणांसह सरासरी 64.6 गुणांसह पात्रता फेरी नोंद केली होती. तर भारताची आणखी एक जोडी इलावेनील वलरिवनने 316.8 आणि पार्थ मानेने 317.4 असे एकूण सरासरी 634.2 गुणांची नोंद केली. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये सोनम आणि हिमांशू यांनी 441.2 गुणांसह कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात चीनने सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविले आहे. सोनम मस्कर हा महाराष्ट्राचा रहिवासी असून त्याने अलिकडच्या विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.