'हर्षवर्धन राणे' च्या 'दिवानीयत'मध्ये 'सोनम बाजवा'!
मुंबई
अभिनेता हर्षवर्धन राणे चा दिवानीयत हा चित्रपट नुकताच अनाउन्स करण्यात आला. या सिनेमाचे प्री प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले असून लवकरच चित्रपटाचे शुटींग सुरु होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत हर्षवर्धन राणे असून आणि सोनम बाजवाचे नावही पुढे येत आहे.
चित्रपटाची निर्मिती विकीर मोशन पिक्चर्सच्या अमूल व्ही मोहन आणि अशुल मोहन यांची आहे. मुश्ताक शेख यांचे कथानक असून दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी यांचे आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची पूर्णपणे तयारी झाली असून २०२५ च्या शेवटाला प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे कास्टींग झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरून अभिनेत्री सोनम बाजवा आणि हर्षवर्धन राणे यांनी पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. या पोस्टला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षवर्धन राणे आजवर तमिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अनेक चित्रपटातील कॅमिओ रोल नेहमीच चर्चेत आहेत. त्यांच्या या दिवानीयत चित्रपटाची चाहते नक्कीच वाट पाहत आहेत.