सोनाली सहगलचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन
मातृत्वानंतर बदलले जीवन
आई झाल्यावर आता अभिनेत्री सोनाली सहगल काम अन् घरादरम्यान संतुलन साधून स्वत:चा वेळ अन् अटींनुसार काम करत आहे. तिचा चित्रपट आर्यभट्ट का झिरो अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. आई झाल्यावर पुन्हा कामावर परतण्याची उत्सुकता असताना काही प्रमाणात नर्व्हस देखील होती असे सोनालीचे सांगणे आहे.
मागील दीड वर्षांमध्ये मी फारसे काम केले नव्हते. आर्यभट्ट का झिरो चित्रपटाच्या प्रमोशनवेळी माझी आई अन् मुलगी सोबत होती. या चित्रपटाद्वारे माझी बॉलिवूडमध्ये वापसी झाल्याने आनंदी आहे. आता माझे निर्णय बऱ्याचअंशी मुलीवर निर्भर असतात, कारण मला तिलाही वेळ द्यायचा आहे. किती तास देऊ शकेन, लोकेशन कोणते आहे, माझी मुलगी तेथे येऊ शकते की नाही याचा विचार करून मी प्रोजेक्ट निवडणार आहे. आता मला केवळ समाधानासाठी काम करायचे असल्याचे सोनाली सांगते. स्वत:च्या बाळासोबत माझा एक नित्यक्रम ठरला आहे. तिला झोपविणे, अन्न भरविणे, रात्री झोपण्यापूर्वी गोष्टी ऐकविणे हे मीच करते. निर्माते ही गोष्ट समजून घेतील अशी अपेक्षा करू शकते. तसेच निर्णय प्रोजेक्टच्या स्वरुपावरही अवलंबून असतो. अनेक प्रोजेक्टमध्ये वेळ अधिक द्यावा लागत असतो. अनेकदा लोकेशनच्या अडचणी असतात. कलाकार म्हणून मी स्वत:चे पूर्ण योगदान देणार आहे, परंतु निर्मात्यांनीही माझी स्थिती समजून सेटवर प्राथमिकता देणे आवश्यक असल्याचे सोनालीने म्हटले आहे.