महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रासपच्या जिल्हा महिला संपर्कप्रमुख सोनाली फाले भाजपात

08:02 PM Oct 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख सोनाली फाले यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश केला. सोनाली फाले या गेली दोन वर्ष राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असून अनेक बचत गट महिलांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. महायुतीने महिलांसाठी राबवलेल्या योजना महिलांपर्यंत पोहचवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सोनाली फाले यांनी सांगितले.
भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी विधानसभा प्रमुख तथा पडेल मंडल अध्यक्ष रामचंद्र बाळू कोकरे, शहराध्यक्ष सुरेश जंगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat news update # tarun Bharat sindhudurg # konkan update # Marathi news
Next Article