कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘द पॅराडाइज’मध्ये सोनाली कुलकर्णी

06:57 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चित्रपटातील फर्स्ट लुक जारी

Advertisement

‘द पॅराडाइज’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्य नायिका सोनाली कुलकर्णीचा फर्स्ट लुक जारी केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नानी आहे, तर याचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला करत आहे. चित्रपटातील सोनाली कुलकर्णीची भूमिका अत्यंत वेगळी असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक श्रीकांत ओडेला आणि नानी यांनी यापूर्वी ‘दसरा’ चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.

Advertisement

तर द पॅराडाइज हा चित्रपट नानीच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा आणि खास प्रोजेक्ट असल्याचे मानले जात आहे. एसएलव्ही सिनेमाच्या सहकार्यातून निर्मित ‘द पॅराडाइज’ चित्रपट 8 भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, तेलगू, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार आहे. श्रीकांत ओडेलाने स्वत:चे दिग्दर्शकीय पदार्पण ‘दसरा’ चित्रपटाद्वारे केले होते. या चित्रपटाचे समीक्षकांकडुन कौतुक करण्यात आले होते तसेच तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट नानीच्या कारकीर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article