For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गार्डनचे काम सुरू होताच नगरसेविका सोनल म्हावळंकर यांचे उपोषण स्थगित; कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या प्रभाग 5 मधील उद्यान विकासकामाला प्रारंभ

02:14 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गार्डनचे काम सुरू होताच नगरसेविका सोनल म्हावळंकर यांचे उपोषण स्थगित  कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या प्रभाग 5 मधील उद्यान विकासकामाला प्रारंभ
Advertisement
 दोडामार्ग / प्रतिनिधी : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व्हे नं. 44/1/10 येथील खुल्या जागेत गार्डन विकसित करण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. काम सुरू झाल्यानंतर नगरसेविका सोनल म्हावळंकर यांनी जाहीर केलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्याने त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता.

प्रभाग क्रमांक 5 मधील गार्डन विकसित करण्याच्या कामाला 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, मान्यता मिळूनही अनेक दिवस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नगरसेविका सोनल म्हावळंकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाच्या दिरंगाईकडे लक्ष वेधले होते.

Advertisement

तसेच, आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास 4 नोव्हेंबरपासून गार्डनच्या जागेवर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाकडून काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आणि अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

गार्डनच्या कामाला सुरुवात झाल्याने प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, नगरसेविका सोनल म्हावळंकर यांनी उपोषण स्थगित केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.