कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मिर्झापूर’ मध्ये सोनल चौहानची एंट्री

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहारची ’मिर्झापूर : द फिल्म’मध्ये एंट्री झाली आहे. याची माहिती निर्मात्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. सोनलने देखील निर्मात्यांचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे. सोनलला ‘जन्नत’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते.  मिर्झापूर : द फिल्ममध्ये सामील होण्यासाठी मी अत्यंत उत्साही आहे. या टीमचा हिस्सा होता येणार असल्याने मी अत्यंत आनंदी आहे. या आयकॉनिक फ्रेंचाइजीचा हिस्सा करण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार अशी पोस्ट सोनलने निर्मात्यांना उद्देशून केली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण वाराणसीत सुरू झाले आहे. चित्रपटात अली फजल एका बॉडी बिल्डरच्या भूमिकेत आहे.

Advertisement

क्राइम थ्रिलर चित्रपट ‘मिर्झापूर’मध्ये सिंहासनासाठी लढणाऱ्या बाहुबलींचे जग दाखविले जाईल. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटात सीरिजमधील व्यक्तिरेखांची मोठ्या पडद्यावर वापसी होणार आहे. यात कालीन भैयाच्या रुपात पंकज त्रिपाठी, गु•tच्या रुपात अली फजल आणि मुन्नाच्या रुपात दिव्येंदु शर्मा यासारखे कलाकार दिसून येतील.  चित्रपटात श्वेता त्रिपाठी ही गोलू गुप्ताच्या भूमिकेत असेल. तर रसिका दुग्गल चित्रपटात बीना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसून येईल. जितेंद्र कुमार, रवि किशन आणि मोहित मलिक यासारखे नवे कलाकारही दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article