‘दहाड 2’मध्ये दिसणार सोनाक्षी
डिसेंबरमध्ये सुरू होणार चित्रिकरण
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे चित्रपट फारसे चालले नाहीत, परंतु सीरिजमधील तिच्या अभिनयाला दाद मिळाली आहे. 2023 मध्ये ‘दहाड’ या सीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता या सीरिजचा सीक्वेल येणार आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनासाठी रीमा कागती यांचे कौतुक झाले हेते. ‘दहाड’ या सीरिजच्या सीक्वेलमध्येही सोनाक्षी सिन्हाच मुख्य भूमिकेत असणार आहे. रीमा कागती आणि सोनाक्षी ‘दहाड 2’ साठी पुन्हा एकत्र येणार आहेत. ‘दहाड 2’ची कहाणी निश्चित झाली असून डिसेंबर महिन्यापासून याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. सध्या वेबसीरिज निर्मितीपूर्व टप्प्यात आहे. ‘दहाड 2’मध्ये पुन्हा एकदा सोनाक्षी ही अंजली भाटीची भूमिका साकारणार आहे. सोनाक्षीच्या व्यतिरिक्त अन्य कलाकारांची सध्या निवड केली जात आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये एक दमदार अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.