For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सिस्टीम’मध्ये सोनाक्षी सिन्हा

07:00 AM May 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सिस्टीम’मध्ये सोनाक्षी सिन्हा
Advertisement

सोनाक्षी सिन्हा लवकरच एका ओटीटी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव सिस्टीम आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जारी करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये सोनाक्षीसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका तसेच आशुतोष गोवारिकर दिसून येत आहे. तसेच चित्रपटात सोनाक्षी एका वकिलाची भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरमधून स्पष्ट होते. सिस्टीम हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात याचबरोबर प्रीति अग्रवाल, आदिनाथ कोठारे, आश्रिया मिश्रा, गौरव पांडे आणि सायंदीप गुप्ता हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. पम्मी बावेजा, हरमन बावेजा आणि स्मिता बालिगा यांनी  या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर याची कहाणी हरमन बावेजा, अरुण सुकुमार, अश्विनी अय्यर तिवारी, तस्नीम लोखंडवाला आणि अक्षत घिल्डियाल यांनी लिहिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.