‘जटाधारा’मध्ये सोनाक्षी सिन्हा
वेकंट कल्याण यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट जटाधाराचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. या चित्रपटात शिल्पा शिरोडकरच्या एंट्रीमुळे यापूर्वीच प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची यात एंट्री झाली आहे. जटाधारा एक सुपरनॅचरल आणि मिस्ट्री थ्रिलर ड्रामा असून याची कहाणी वेंकट कल्याण यांनीच लिहिली आहे. या चित्रपटात सुधीर बाबू मुख्य भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील अभिनेत्याचा लुक जारी झाला आहे. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची चित्रपटातील एंट्री निश्चित झाली असून तिचा चित्रपटातील पहिला लुक देखील जारी करण्यात आला आहे.
सोनाक्षी सिन्हा हिची या चित्रपटात वर्णी लागली आहे. चित्रपटातील सोनाक्षीचा लुक अत्यंत आकर्षक आहे. सुधीरबाबू यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच चित्रिकरण सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा चित्रपट अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या रहस्यांच्या अवतीभवती घुटळमळणारा असेल असे समजते. यात मंदिराच्या परंपरा, विचार आणि वैज्ञानिक आणि रहस्यमय घटनांचा शोध लावताना दाखविले जाईल.