‘तू है मेरी किरण’मध्ये सोनाक्षी
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल लवकरच ‘तू है मेरी किरण’मध्ये एकत्र दिसून येतील. या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. सोनाक्षीने दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यापासून अंतर राखले होते. परंतु आता हे दांपत्य लवकरच ‘तू है मेरी किरण’मध्ये एकत्र अभिनय करताना दिसून येणार आहे.
चित्रपट रोमँटिक थ्रिलर धाटणीचा असेल, चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये सोनाक्षी एका टेबलवर लॅपटॉपवर काम करताना दिसून येत आहे, तर शेजारी बसलेला जहीर तिच्याकडे बघत असल्याचे पोस्टरमध्ये दाखविण्यात आले आहे. सोनाक्षीचा हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी अन् लेखनाची जबाबदारी करण रावलने पेलली आहे. तर याची निर्मिती सर्वेश गोयल, अश्वनी कुमार, मनोज दराक आणि नृपाल पटेल यांनी मिळून केली आहे. सोनाक्षी आणि जहीरने यापूर्वी 2022 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘डबल एक्स एल’मध्येही एकत्र काम केले होते. परंतु तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. सोनाक्षी आणि जहीरने सुमारे 7 वर्षापर्यंत एकमेकांना डेट केल्यावर जून 2024 मध्ये विवाह केला होता.
