कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘निकिता रॉय’मध्ये सोनाक्षी

06:28 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रहस्यमय धाटणीचा चित्रपट

Advertisement

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा रहस्यमय धाटणीच्या चित्रपटात दिसून येणार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘निकिता रॉय’चे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे. याचबरोबर याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

सोनाक्षीचा हा चित्रपट भयपट तसेच रहस्यमय धाटणीचा आहे. यापूर्वी सोनाक्षीने ककुडा या भयपटात काम केले होते, यातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते. सोनाक्षीचा निकिता रॉय हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

चित्रपटाचे पोस्टर सोनाक्षीने शेअर केले आहे. अभिनेत्रीसोबत पोस्टरमध्ये अर्जुन रामपाल आणि परेश रावल दिसून येत आहेत. तिन्ही स्वत:च्या इंटेंस लुकमध्ये आहेत, पोस्टरमध्ये चित्रपटाचा दिग्दर्शक कुश सिन्हा देखील दिसून येत आहे. कुश हा सोनाक्षीचा भाऊ आहे.

हा चित्रपट 30 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. निकिता रॉयची कहाणी भीती अन् रहस्याने भरपूर असणार आहे. हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद मेहता, प्रकाश नंद बिजलानी, शक्ति भटनागर, महनाज शेख, प्रेमराज जोशी यांनी मिळून  केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article