कोर्टरुम ड्रामामध्ये सोनाक्षी
निल बटे सन्नाटा, बरेली की बर्फी आणि पंगा यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या अश्विनी अय्यर तिवारी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी भावनात्मक कहाण्यांसोबत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अश्विनी अय्यर एका कोर्ट रुम ड्रामासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. तसेच ज्योतिका देखील यात मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याचे चित्रिकरण लवकरच मुंबईत सुरू होणार आहे. प्रारंभी या चित्रपटाची ऑफर करिना कपूर आणि कियारा अडवाणी यांना देण्यात आली होती, परंतु त्यांच्यासोबतची बोलणी यशस्वी न ठरल्याने चित्रपटाला विलंब झाला.
आता सोनाक्षी अन् ज्योतिकासोबत हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरविण्यात आलेले नाही. याची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट आणि हरमन बावेजाच्या बावेजा स्टुडिओकडून केली जाणार आहे.