For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हौसेसाठी घरात केली चोरी; मुलानेच मारला १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

12:33 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
हौसेसाठी घरात केली चोरी  मुलानेच मारला १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
Advertisement

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शांकभरी कॉलनी, शिंगणापूर येथे सुनिल सुखदेव बंडगर (वय ४६, रा. सदाशिव शांता पार्क, आनंद आकाश कार्यालयासमोर) यांच्या घरी घरफोडी झाली होती. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. सुनिल बंडगर यांनी धाव घेत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र ही चोरी चैनीसाठी त्याचाच मुलानेच केल्याचे उघड झाले असुन या चोरी प्रकरणी यश सुनिल बंडगर (रा. सदाशिव शांता पार्क, आनंद आकाश कार्यालयासमोर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली आहे.

Advertisement

याप्रकरणी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना जिल्ह्यातील घरफोडी, दरोडे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार केली. जालिंदर जाधव यांच्या पथकातील अंमलदार शुभम संकपाळ व युवराज पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ही चोरी फिर्यादीचा मुलगा यश बंडगर यानेच केली असून तो लक्षतीर्थ वसाहत येथे दागिने विकायला येणार आहे. पथकाने लक्षतीर्थ वसाहत ते शिंगणापूर रोडवरील किडकाडी मंदिराजवळ सापळा रचून आरोपी यश बडगरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी मुद्देमाल करवीर पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास सुरू आहे.

हौसेसाठी घरात केली चोरी
आरोपी यश बंडगर अभियांत्रिकिच्या वर्गात शिकत आहे. त्याने घरात केलेली चोरी ही मोबाईल व गाडीच्या हव्यासापोटी केली असुन त्याला घरातुन म्हणावे तसे सहकार्य मिळत नव्हते. तो कॉलेजला देखील लिप्ट मागुन जात होता. आपल्या बरोबरचे आपले मित्र महागडा मोबाईल गाडी वापरतात, तसेच आपणही वापरावे या हव्यासापोटी त्याने चोरी केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.