For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आईचा खून केल्या प्रकरणी मुलाला जन्मठेप

04:33 PM May 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आईचा खून केल्या प्रकरणी मुलाला जन्मठेप
Advertisement

प्रतिनिधी : ओरोस

Advertisement

स्वतःच्या आईचा खून केल्याच्या आरोपाखाली दीपक विष्णू दळवी ( 46 ) रा. विलवडे ,सावंतवाडी याला दोषी धरून जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस देशमुख यांनी त्याला जन्मठेपेसह द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. आपली आई लोकांना आपल्या विरोधात काहीतरी खोटे नाटे सांगत असल्याच्या संशयावरून डोक्यात राग घालून घेत दीपक याने आपल्या आईला जबर मारहाण केली होती. अखेर ती बेशुद्ध पडली होती व त्यातच तिचा मृत्यू झाला होता. 25 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. आरोपी वर भा.द.वि कलम 302 नुसार गुन्हा दाखल होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.